बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (18:27 IST)

ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स'ला मिळत असलेल्या प्रेमाविषयीचा आपला अनुभव शेअर केला!

अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्यूजिकल ड्रामा 'बंदिश बैंडिट्स'ने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. आपल्या नव्या कॉन्सेप्ट आणि संगीतामुळे, ही सिरीज देशभरात सुपर हिट ठरली आहे.
 
श्रेया चौधरी, जी तमन्ना आणि ऋत्विक भौमिक जो या सिरीजमध्ये राधे यांच्या मुख्य भूमिका साकारत आहेत, त्यांनी सिरीजला मिळणाऱ्या इतक्या शानदार प्रतिक्रियांबद्दलचा आपला अनुभव सांगितला.
 
श्रेया म्हणते की, "हे कमाल आहे! प्रत्येकाचे मैसेज वाचताना आणि कॉल अटेंड करताना स्वतःला भरून पावल्यासारखे वाटते आहे. हे खूप रोमांचक आहे."
 
ऋत्विकला आलेल्या खूप साऱ्या प्रतिक्रियांमधून त्याच्या आवडत्या  प्रतिक्रियेविषयी विचारणा केली असता यातील एखादीच प्रतिक्रिया निवडता येणे शक्य नसल्याचे तो म्हणाला, तो म्हणतो, "खरंच, मी या पैकी एखादीच अशी खास प्रतिक्रिया नाही सांगता येणार, सर्वांकडूनच खूप सारे प्रेम मिळत आहे बहुत सारा प्यार मिल रहा है. प्रेक्षकांना आम्ही आवडू याची मला आशा होती पण लोकं आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप सारे गायक देखील मला हा मैसेज करत आहेत कि एका गायकाची भूमिका तुम्ही उत्तम वठवली आहेत."
 
खरे पाहता, संगीत हे या सीरीजचे अविभाज्य अंग आहे आणि संगीताने या सीरीजला खोलवर धरून ठेवले आहे, या मुख्य जोडीने आपल्या आवडत्या गायकांविषयी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
 
श्रेया म्हणाली, "माझ्या सर्वात आवडत्या गायकांमध्ये एक आहेत प्रतीक कुहाड. मी प्रतीक कुहाड यांची खूप मोठी चाहती आहे. अगदी नंबर एकची!"
 
"मला लिसा मिश्रा यांच्या आवाजावर प्रेम आहे. मला त्यांचा आवाज खूप आवडतो.", ऋत्विक भौमिकने गायिका लीसा यांच्यासाठी असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
नुकतेच, 5 ऑगस्टला एक लाइव बंदिश बैंडिट्स कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते, जो अतिशय यशस्वी ठरला. या मध्ये कलाकार आणि गाण्यांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले ज्यावर प्रत्येक जणाने आनंदाने ठेका धरला होता. 
 
'बंदिश बैंडिट्स' या दहा भागांच्या सीरीजमध्ये उगवता तारा ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरी यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तैलंग यांसारखे उमद्या कलाकारांची टीम आहे. अमृतपाल सिंह बिंद्रा यांच्या द्वारे निर्मित आणि आनंद तिवारी द्वारे दिग्दर्शित, या नव्या अमेझॉन ओरिजिनल सीरीज मध्ये दोन विभिन्न सांगीतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन युवा कलाकारांच्या प्रेमकथेला चितरण्यात आले आहे.