गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (13:30 IST)

या शहरात हेल्मेटची सक्ती करण्यात आली, कायदा मोडल्यावर जेल होऊ शकते

सध्या रस्ते अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वत्र हेल्मेट सक्तीचे बंधन लावण्यात आले आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल  देखील सांगण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्याने  काय होऊ शकत या साठी काही समुपदेशन देखील देण्यात आले आहे. आता नाशिक शहरात पोलिसायुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट सक्तीचे पालन करण्यास सांगितले आहे. येत्या 6 नोव्हेंबर पासून नाशिक शहरात शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी घालणार आहे. तसेच  नाशिक शहरात पेट्रोल पंपावर  हेल्मेट शिवाय प्रवेश केल्यास देखील पेट्रोल मिळणार नाही हेल्मेट शिवाय प्रवेश केल्यावर आणि पेट्रोल दिल्या वर पेट्रोल पंपाचे न लायसेन्स जप्त केले जाईल आणि या नियमाचे पालन न केल्यास थेट जेल होऊ शकते.