मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (08:06 IST)

शेतकऱ्यांना मदत याच पवार साहेबांसाठी वाढदिवस शुभेच्छा - जयंत पाटील

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या भीषण संकटामुळे चिंतेत आहे. पाण्यासाठी दुष्काळग्रस्त जनता आणि पशुधनाचीही तगमग होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार  १२ डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. वाढदिवशी कुठल्याही समारंभ वा कार्यक्रमावर खर्च करण्याऐवजी आपल्या भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शक्य ती मदत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वतीने केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी खा. शरद पवार बुधवार, १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई येथे उपस्थित असतील. मात्र शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ वा भेटवस्तू आणू नयेत, अशी त्यांचीच इच्छा आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.