1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (21:40 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर  यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेमकी कोणत्या महिला नेत्याची नियुक्ती अशीच चर्चा होती. त्यात आता हेमा पिंपळे  यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
 
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी दिला राजीनामा
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्याने पक्षातील पदावरून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. आता महिला राष्ट्रवादी अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागते हा मोठा प्रश्न होता. मात्र आता हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
 
हिजाब आंदोलनामुळे चर्चेत
 
बीडच्या हेमा पिंपळे यांनी काही दिवसापूर्वी हिजाबच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन केले होते. कर्नाटकमध्ये हिजाबवरुन  चाललेल्या राजकारणाचा निषेध करत, हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आलीय. या रॅलीत हिंदू महिलांनीही हिजाब परिधान करुन मुस्लिम महिलांना पाठिंबा दिला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली काढण्यात आली होती.