1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (10:04 IST)

विहीर खचून दोघांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू

Both of them died after getting stuck in a pile of wells विहीर खचून दोघांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यूMaharashtra Regional News In Webdunia Marathi
वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यात एकलासपुरात विहिर खणण्याचे काम सुरु असताना विहीर खचून ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. गजानन लाटे (38) आणि प्रभू गवळी (37) असे या मयत मजुरांची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एकलासपूर येथील गजानन मुळे यांच्या कडे विहीर खोल करण्याचे काम सुरु होते. या कामात सुमारे पाच ते सहा मजूर लागलेले होते. त्यापैकी तिघे जण विहिरीच्या आत काम करत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक विहिरीचा काही भाग खचून कोसळला आणि त्यामध्ये दोन मजूर ढिगाऱ्याखाली दाबले गेले आणि त्यांचा त्यात अडकून मृत्यू झाला. आणि एक मजूर जखमी झाला . शेख अखतर शेख दादू असे या जखमी झालेल्या मजुराचे नाव असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.