शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (08:39 IST)

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सातारच्या तिघांची निवड

मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, (भोसरी) पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ज्युनियर फ्री स्टाईल मुले, ज्युनियर ग्रीको रोमन मुले व ज्युनियर फ्री स्टाईल मुली राज्यस्तरीय निवड चाचणीत सातारचे सुमित गुजर (खातगुण), महेश कुंभार (बुध) आणि साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 
२९ ते ३१ मार्च अखेर पटना बिहार येथे
 
येथे होणाऱ्या ज्युनियर फ्री स्टाईल मुले, ज्युनियर ग्रीको रोमन मुले व ज्युनियर फ्री स्टाईल मुली राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जागतिक दर्जाच्या मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, भोसरी पिंपरी चिंचवड येथे निवड चाचणी पार पडली. निवड चाचणीत ४८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. निवड चाचणीमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले मल्ल खालील प्रमाणे
 
ज्युनियर फ्री स्टाईल मुले:-
 
५७ किलो अतिश तोडकर ( बीड ),
६१ किलो रमेश इंगवले (कोल्हापूर),
६५ किलो सुमित गुजर (सातारा),
७० किलो रविराज चव्हाण (सोलापूर),
७४ किलो महेश कुंभार (सातारा),
७९ किलो कालिचरण सोलंकर ( सोलापूर)
८६ किलो प्रतीक जगताप (पुणे),
९२ किलो बाबासाहेब तरंगे
९७ किलो सुनील खताळ (कोल्हापूर)
१२५ किलो महेंद्र गायकवाड (सोलापूर ),
 
ज्युनियर ग्रीको रोमन मुले
५५ किलो किरण गोहाड ( नाशिक )
६० किलो ज्ञानेश्वर देसाई (कोल्हापूर),
६३ किलो भाऊराव सदगीर (नाशिक),
६७ किलो स्वरूप चौगुले (कोल्हापूर),
७२ किलो ओमकार पाटील (कोल्हापूर)
७७ किलो विजय डोईफोडे (सातारा),
८२ किलो अनिकेत जाधव (मुंबई),
८७ किलो दर्शन चव्हाण (कोल्हापूर),
९७ किलो पृथ्वीराज खडके (पुणे)
१३० किलो अजय खरात (सोलापूर)
 
ज्युनियर फ्री स्टाईल मुली:-
५० किलो कल्याणी गडेकर (वाशीम),
५३ किलो धनश्री फंड (अहमदनगर),
५५ किलो साक्षी पाटील (सातारा),
५७ किलो सोनाली मंडलिक (अहमदनगर),
५९ किलो भाग्यश्री फंड (अहमदनगर),
६२ किलो सुर्ष्टी भोसले (कोल्हापूर)
६५ किलो अमृता पुजारी (कोल्हापूर)
६८ किलो प्रतीक्षा बागडी (सांगली)
७२ किलो गौरी जाधव (ठाणे)
७६ किलो वैष्णवी कुशाप्पा (कोल्हापूर)