तीन महिन्यांच्या आत हे सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना- दत्तात्रय भरणे
राज्यात सध्या बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्रांची व तहसिल कार्यालयांची माहिती घेवून तीन महिन्यांच्या आत हे सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.लातूर जिल्ह्यातील तहसिल कार्यालयात सर्वच एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्र ३१ डिसेंबर २०२१ रोजी पासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबद्दल प्रश्न विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांनी विधानसभेत विचारला होता. या चर्चेत नमिता मुदंडा यांनी भाग घेतला.लातूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना सर्व प्रकारच्या सेवा विहित कालावधीत व विहित शुल्क आकारून देण्याबाबत सूचना देण्यात येतील. राज्यात देखील 12 जिल्ह्यातील तहसिलअंतर्गत सेतू सुविधा केंद्र बंद आहेत अशा तक्रारींची माहिती घेऊन सदर सेतू सुविधा केंद्र तीन महिन्यात पुन्हा सुरू करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती श्री. भरणे यांनी विधानसभेत दिली.