शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (07:59 IST)

रश्मी ठाकरेंचे बंधू ईडीच्या रडारवर; तब्बल ७ कोटींच्या संपत्तीवर टाच

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत आज पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीवर जोरदार कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचे संचालक हे श्रीधर पाटणकर हे आहेत. आणि पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आहेत. त्यामुळे ईडीने आता मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.या कारवाईत ईडीने मुंबईतील तब्बल ७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात नीलांबरी या प्रकल्पातील ११ घरांचा समावेश आहे. पाटणकर यांची साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी आहे. आणि ही सर्व ११ घरे साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या मालकीची आहेत. तसेच, पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. २०१७ मध्ये ईडीने पुष्पक कंपनीवर कारवाई केली होती. त्यावेळीही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. दरम्यान, ठाकरे परिवाराशी निगडीत आणि जवळच्या व्यक्तींवर ईडीने कारवाई सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.