रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (18:05 IST)

शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर

शिवसेनेच्या वतीने 22 ते 25 मार्च शिवसेना संपर्क मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. या साठी वर्ध्यात विश्रामगृहात मुबईहून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना प्रमुख आले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या पूर्व तयारीसाठी मुबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोर शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी कार्यकर्त्यांसह विश्राम गृहात  दाखल  होऊन विधानसभा प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी वाद करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आणि विश्रामगृहाच्या साहित्याची नासधूस केली. या प्रकरणात माजी खासदार अनंत गुढे यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.  अनंत गुढे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की विश्राम गृहात दाखल झाले असताना तुषार देवढे  यांच्या हातात पिस्तूल होती त्यांनी शिवीगाळ करून पदाधिकाऱ्यांना जिवेमारण्याची धमकी दिली. त्यांना अटक करावी अशी मागणी गुढे यांनी केली आहे.