दारू पाजून तरूणीवर आळीपाळीने अत्याचार
तरूणीच्या घरात घुसून दोघा भावांनी तिला दारू पाजली. बेशुध्द झालेल्या तरूणीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली.
या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार तुकाराम चव्हाण, रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरूडगाव रोड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी घरी एकटीच असताना तुषार व रोनक हे दोघे तिच्या घरात आले व म्हणाले, आम्हाला जेवण करायचे आहे.
तेव्हा तरूणी त्यांना म्हणाली, तुम्ही आधी घराबाहेर जा, माझ्या घरात तुम्हाला जेवण मिळणार नाही. तेव्हा तुषारने तरूणीला धरले व रोनकने खिशातून दारूची बाटली काढून तरूणीला दारू पाजली.
दारू पाजल्यामुळे तरूणी बेशुध्द झाली यानंतर तुषार व रोनकने आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहेत.