1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (08:54 IST)

सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्या महत्वाचा प्रश्न आहे - शरद पवार

Misuse of all Central Investigation Agencies is an important issue facing the country right now - Sharad सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्या महत्वाचा प्रश्न आहे - शरद पवार Maharashtra Regional News In Webdunia Marathi
महाविकास आघाडी सरकार (च्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. पण ईडीची (ED) कारवाई आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांपर्यंत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. यामुळे राज्यातील राजकीय गटात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  यांची ठाण्यातील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार  यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपये किंमतीचे त्यांची ११ फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले “सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्या महत्वाचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना राजकीय सुडाच्या हेतूनं त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं. पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवानं गैरवापर सुरु आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहेत. पण त्यावर आता चर्चा न केलेली बरी.”