शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (10:11 IST)

संभूखेडचे जवान सचिन काटे यांना वीर मरण

माण तालुक्यातील संभूखेड गावाचे जवान सचिन विश्वनाथ काटे(24) यांना  राजस्थान मध्ये देशसेवेत आपले कर्तव्य बजावत वीर मरण आले. त्यांच्या निधनाने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.  त्यांना देशसेवेचे कर्तव्य बजावता राजस्थान मध्ये 20 ऑक्टोबर रोजी रात्री वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी राजस्थानच्या लष्करी युनिटच्या अधिकाऱ्यांनी सचिन काटे यांचे भाऊ रेवन काटे यांना दिली. 5 वर्षांपूर्वी सचिन काटे हे भारतीय सेनेत भरती झाले होते आणि देशसेवेचे कर्त्तव्य बजावत होते. त्यांचा लहान भाऊ रेवन हे देखील आसाम येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत आहे. सचिन काटे यांचा पश्चात आई वडील  भाऊ असा परिवार आहे. सचिन यांच्या निधनाने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या वर शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी संभूखेड गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.