मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (09:35 IST)

‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार, ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट

‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे. राज्यात १ एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहे.उच्च सुरक्षायुक्त प्लेट बसविल्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक वाहन पोलीस व परिवहन विभागाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅक करता येणार आहे. महिला सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय परिवहन विभागाने मोटर वाहन अधिनियमांतर्गत २००५ मध्ये देशभरातील एचएसआरपीएफ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्येच तसा आदेश दिला होता. त्यानंतर १३ वर्षांनी राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक इंडिया लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम नव्या नंबर प्लेटवर राहील. आरटीओ वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे अनेक अपराध सोबत अपघात करवून पळून जाने, गाडी चोरी सोबत इतर सर्व गुन्हे कमी होतील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सरकार नियंत्रण करणार आहे.