मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (21:09 IST)

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट

ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर न्हा सुरु झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. 
 
हवामान खात्याने आजच्या दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केली आहे.
 
16 ऑगस्ट रोजी दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.
 
तर 17 ऑगस्टला राज्याच्या अनेक भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करणात आला आहे.
 
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पट्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
19 ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही.