रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (09:40 IST)

'हिंदूंचे सण आले की अटी लागू करतात' - राम कदम

19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येईल असं सरकारकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.
गृह विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी मान्यता दिली. सर्व नियमांचं पालन करत आरोग्याची काळजी घेत शिवजयंती साजरी करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

भाजपने मात्र या नियमावलीवर टीका केलीय. आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.
 
"हिंदूंचा उत्सव आला की अटी लागू केल्या जातात. शिवजयंती साजरी करताना ठाकरे सरकारच्या जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. काय करायचं ते करा आम्ही शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करणार," असं राम कदम म्हणाले.