गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (17:04 IST)

Hingoli : राष्ट्रीय महामार्गावर संत्र्याच्या ट्रक ने पेट घेतला लाखांचे नुकसान

राज्यातील हिंगोली शहराजवळ गारमाळ गावा जवळ एका ट्रकला आग लागली या आगीत दहा लाखांची संत्री जळून खाक झाली. अमरावतीहून हैद्राबाद जाणाऱ्या ट्रक ने हिंगोलीनजीक राष्ट्रीय महामार्गावर पेटला चालकाने स्वतःचा जीव वाचवत ट्रक मधून बाहेर उडी घेतली. या मध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. 

सदर घटना हिंगोली शहरानजीक गारमाळ गावा जवळ अमरावतीहून हैद्राबाद येथे संत्री घेऊन जाणाऱ्या ट्रक ला आग लागली. या आगीतून चालकाने थेट उडी मारून आपला जीव वाचवला. आगीनंतर ट्रक ला विस्फोट झाला.या घटनेत ट्रक जळून खाक झाले तसेच संत्री देखील जाळून खाक झाली आहे.

हिंगोली अग्निशमनदलाने घटनास्थळी पोंहोंचून आगीवर नियंत्रण मिळवले तो पर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद केली आहे. या आगीत शेतकऱ्याचे आणि ट्रकच्या मालकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.   
 
 
Edited by - Priya Dixit