गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (17:47 IST)

गर्दी आणि बेजबाबदारपणामुळे येणार तिसरी लाट?

दिवाळीपूर्वी नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जात आहेत आणि या काळात कोरोना प्रोटोकॉलचा त्यांना विसर पडला आहे. कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरत असली तरी यंदाच्या दिवाळीत कोरोना नियमांची कोणीही पायमल्ली करू नये अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय फटाक्यांच्या बाबतीत देखील नियमावली जारी करण्यात आली आहे.
काय आहेत नियम
नागरिकांनी विक्रेत्यांकडे सुधारित ग्रीन फटाक्यांचीच मागणी करावी
मोठी लड किंवा 500 च्या पुढे फटाके असलेली लड घेऊ नये.
ऑनलाइन फटाके मागवू नयेत.
बेरियम सॉल्ट केमिकल असलेल्या फटाक्यांवर बंदी आहे.
लिथियम अल्सेनिक असलेले फटाके घेऊ नयेत
125 डेसिबल आवाज करणारे फटाके वापरणे टाळावे.
नागरिकांना माहिती नसली तरीही प्रशासनाकडून याची तपासणी केली जाणार आहे.
मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळावे.
रात्री 8 ते 10 या कालावधीतच फटाके वाजवावेत.
आपल्या आजू-बाजूच्या लहान मुले, वृद्धांची काळजी घेऊन, ध्वनी व हवेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
शांतता झोनच्या 100 मीटर परिसरात फटाके वाजवू नयेत. शांतता झोन म्हणजे न्यायालय, हॉस्पिटल, नर्सिंग रुम इत्यादी.