मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (17:39 IST)

Israel-Hamas War: 'इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता', संजय राऊत यांचे यहुदी विरोधी पोस्टबाबत स्पष्टीकरण

'यहुदी विरोधी' पोस्टबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की त्यांचा हेतू इस्रायलला दुखावण्याचा नव्हता. वास्तविक गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सुरू असलेल्या जमिनीवरील कारवाईदरम्यान इस्रायलच्या दूतावासाने संजय राऊत यांच्याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार केली होती.
 
काय म्हणाले संजय राऊत?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी X वर ती पोस्ट शेअर करून खूप दिवस झाले आहेत. मी ती पोस्ट काढून टाकली आहे. मी माझ्या पोस्टमध्ये हिटलरचा संदर्भ दिला होता, पण इस्रायलच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.
 
7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यांचा आपण निषेध केला असल्याचा दावा शिवसेना (यूबीटी) नेत्याने केला. इस्रायलच्या सूडबुद्धीवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले हमासने ज्या प्रकारे दक्षिण इस्रायलवर हल्ला केला आणि निरपराध लोकांचे प्राण घेतले. मी त्याचा निषेध आणि टीका केली. मात्र त्याचवेळी गाझाच्या रुग्णालयांवर ज्या प्रकारे हल्ले झाले ते मी पाहिले. नवजात आणि बालकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जीवनावश्यक वस्तू रोखल्या गेल्या. त्याचाही मी निषेध केला.
 
युद्धादरम्यान मुलांना लक्ष्य केले जाऊ नये, असे माझे मत असल्याचे राज्यसभा खासदार म्हणाले. कोणीतरी इस्रायली दूतावासाला आपल्या पोस्टला विरोध करण्यासाठी प्रेरित केले असावे, असा दावा त्यांनी केला.
 
इस्रायलच्या दूतावासाने आक्षेप घेतला होता
शिवसेना (यूबीटी) नेत्याने सांगितले की, एक महिन्यानंतरच इस्रायलच्या भारतातील उच्चायुक्ताने मला पोस्टवर पत्र लिहिले. मला असे वाटते की कोणीतरी त्याला मला लिहायला प्रेरित केले असावे. इस्त्रायली दूतावासाने संजय राऊत यांच्या पोस्टवर आक्षेप घेत परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कठोर शब्दांत पत्र लिहिले होते.