रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (16:32 IST)

खेकडा पकडून त्यावर गुन्हे दाखल करा अनोखे आंदोलन

जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अनोखे आंदोलन करत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये चक्क खेकडे आणत आरोपी म्हणून खेकड्याना अटक करावी अशी मागणी केली. धरण खेकड्यांमुळे पडले असे विधान करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.  
 
जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांमुळे पडले असल्याचे विधान केले, खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले होते. या विधानाचा आव्हाड यांनी समाचार घेतला असून कार्यकर्त्यांसमावेत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये जात खेकडे आरोपी म्हणून हजर केले. मंत्री अशाप्रकारे विधान कसे काय करू शकतात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतरही अशी विधाने करून या सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आव्हाड म्हणाले.