गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (16:28 IST)

आयटी इंजिनीअर असलेल्या राहुलने पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या

श्रीरामपूर येथील टाकळीभान गावातील राहुल नानासाहेब पवार वय २८ युवकाने राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आयटी इंजिनीअर असलेल्या राहुलने पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा तरुण आधुनिक पद्धतीने शेती देखील करत होता. त्शेयात तो शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायही सुरू केला होता. तर सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राहुल याला ‘पब्जी’ खेळाची आवड व्यसन जडले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी राहुलने त्याचे महुणे बाळासाहेब तुवर यांना, ‘मी जीवनाला कंटाळलो आहे. मला जगण्यात रस नाही. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. आईची काळजी घ्या’, असा मेसेज पाठवला होता. गावातील काही मित्रांनाही ‘मला माफ करा़ गुड बाय’, असे मेसेज त्याने टाकले. मात्र, हे सर्व मेसेज मध्यरात्री टाकण्यात आल्याने सकाळपर्यंत ते कोणाच्या पाहण्यात आले नाही.