नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हल बसने आई आणि मुलाला २० फूट फरफटत नेले
नागपूरमधील वैष्णो देवी चौकात एका ट्रॅव्हल बसने दुचाकीवरून जाणाऱ्या आई आणि मुलाला धडक दिली. चालकाने त्यांना २० फूट फरफटत नेले. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील देशपांडे लेआउटमधील वैष्णो देवी चौकात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. एका ट्रॅव्हल बस चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाला धडक दिली. धडक बसल्याचे भान नसलेल्या चालकाने त्यांना सुमारे २० फूट फरफटत नेले.
नागपूर जिल्ह्यातील देशपांडे लेआउटमधील वैष्णो देवी चौकात सिग्नलमधून जात असताना दामिनीने अचानक डावीकडून बसला ओव्हरटेक केले. चालकाला ते दिसले नाहीत आणि बसच्या धडकेमुळे दामिनी आणि रिवंश खाली पडले. दोघेही वाहनात आणि बसच्या पुढच्या भागात अडकले. बस चालकाने त्यांना बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी बस थांबवली, तेव्हा त्यांना ही घटना लक्षात आली. नागरिकांनी बस चालकाला पकडले आणि जखमी आई व मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
Edited By- Dhanashri Naik
