रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:14 IST)

विम्याच्या पैशांसाठी पतीचा खून

murder
काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण शिवारात मसोबा फाट्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतकाच्या नावाने एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती. ती आपल्याला मिळावी म्हणून गंगाबाई पवार हिने पती मंचक यांची श्रीकृष्ण बागलाने याला दहा लाख रुपयाला सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण बागलाने याने मंचक पवार याला दिवसभर आपल्यासोबत दारु पाजली. त्यानंतर शहरातीलच एका अज्ञात रस्त्यावर त्याच्या डोक्यात वार करुन खून केला. त्यानंतर त्याला एका स्कूटरवर बसवून मसोबा फाट्याजवळ एका टेम्पोने त्याला धडक दिली. धडकेत मंचक पवार यांचा मृत्यू झाल्याचं भासवलं आणि घटनास्थळाहून श्रीकृष्ण बागलानेसह त्याचे दोन साथीदार पसार झाले.
 
 त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी हा मृतदेह नेमका कोणाचा आणि या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये या व्यक्तीचा मृत्यू अपघातामध्ये झाला असल्याचा संशय पोलिसांना होता. चौकशी केल्यानंतर बीड शहरातील मंचक गोविंद पवार या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे पोलिसांना समजलं.