गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (21:29 IST)

पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची चार्जरच्या वायरने आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या

murder
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची व आपल्या अडीच वर्षाच्या मुलीची चार्जरच्या वायरने आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी परिसरातील आहे. या घटनेने परिसर हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचे नाव आरती समीर मस्के आणि मुलीचे नाव निशात समीर मस्के असे आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला आणि सासूला अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मस्के आणि आरती मस्के हे दांपत्य आपल्या अडीच वर्ष्याच्या मुलीसोबत कांचनवाडी परिसरात वास्तव्यास होते. लग्नानंतर सुरुवातील सर्व चांगले होते. मात्र नंतर समीर आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घेऊ लागला. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. यातून समीर आरतीला मारहाण करू लागला.
 
मात्र रविवारी (दि. ८) दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि समीरने घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली. त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे.समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळून हत्या केली. 
 
याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 
 
Edited By -Ratnadeep Ranshoor