मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (20:33 IST)

काशिद समुद्रात औरंगाबादचे ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता

कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी दोन विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यापैकी, एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा कसून शोध सुरू आहे. येथील समुद्रात एकूण ५ जण बुडाले होते, त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घटना घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळी धाव घेतली आहे.
 
कन्नड तालुक्यातील ७० विद्यार्थी, मुले-मुली हे पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासमवेत ५ शिक्षकही आहेत. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रकिनारी हे सर्वजण गेले असता, यातील ६ मुले समुद्रात बुडाली. सुदैवाने ४ मुलांना वाचवण्यात यश आले असून एक मुलगा बेपत्ता आहे, तर एकाचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रणव कदम याचा मृत्यू झाला असून रोहन बेडवाल अद्यापही बेपत्ता आहे. सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार हरिभाऊ वाघ, रोहन महाजन यांची प्रकृती स्थिर आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor