रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (16:45 IST)

नाशिक: देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात, 13 जखमी

accident
नाशिकात त्र्यंबकेश्वरला भाविकांच्या खासगी बसचा अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या अपघात 13 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर  आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातून निघालेली भाविकांची ही खासगी बस त्र्यंबकेश्वर येथे जात असताना उतारावरून खाली येताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे बस चालकाचं बसवरून ताबा सुटल्याने बस रस्तेच्या कडेला जाऊन उलटली आणि  झाडाला अडकून अपघातग्रस्त झाली. या अपघातात एकूण 29 भाविक प्रवास करत असून त्यापैकी 13 भाविक जखमी झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.   जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
 
Edited By - Priya Dixit