शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (21:08 IST)

मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आले

संजय राठोड प्रकरण पूर्ण राज्यात गाजत आहे. आज ते समोर आले आणि मोठी गर्दी समोर आली होती. यावर राठोड यांची प्रतिक्रिया आली आहे. “पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. मात्र या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहत.