शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (20:36 IST)

आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी येथील कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केले याच पार्श्वभूमीवर  भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ‘धार्मिक, राजकीय कार्यक्रम करू नये आणि आम्ही करणार नाही. मग अशा पार्श्वभूमीवर सुद्धा संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा? त्याला परवानगी मिळते का? आणि ती कशी मिळाली? तिथे गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली, त्याची माहिती गुप्त वार्ता माहिती विभागाला होती का नव्हती? गुप्त वार्ता विभागाने हेतुपुरस्सर गर्दी जमावी आणि प्रसार झाला तरी चालेल, असे धोरण आणि असे काम केले आहे का? या सगळ्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याला मुक संमती आहे, असा समज होतो. अन्यथा आम्ही विचारलेला प्रश्नाला उत्तर द्या, अदृश्य मंत्री दृश्य झाले, अदृश्य कारवाई दृश्य कधी होईल?’
 
पुढे आशिष शेलार म्हणाले की, ‘या कार्यक्रमाविषयी मुख्यमंत्री बोलत नाही आहेत, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची याला मुक संमती आहे, असाच होत आहे. उपमुख्यमंत्री थेट त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांच्याशी नेमके काय बोलतायत, याचे स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे सगळेच प्रकरण गुलदस्त्यात टाकल्यासारखे झाले आहे. लपाछपवी करण्याचे काम केले जात आहे.’