गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (09:30 IST)

माझा घात-अपघात होऊ शकतो – सुषमा अंधारे

sushma andhare
“माझा घात-अपघात होऊ शकतो,” अशी भीती ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
 
“तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालीय,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
 
चंद्रपुरात व्याख्यानानिमित्त आल्या असताना अंधारेंनी ही माहिती दिली.
 
चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर सुषमा अंधारे यांचं व्याख्यान  होते. चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
 
सुषमा अंधारेंच्या या वक्तव्यावर अद्याप राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.
Edited by : Ratnadeep Ranshoor