सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (15:42 IST)

मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात : सुप्रिया सुळे

supriya sule
सध्या ‘पठाण’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. ‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठाण’ चित्रपट तसेच शाहरुख व दीपिकाबाबत भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात.”
 
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या, “अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशा वेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?”
 
पुढे त्या म्हणाल्या, “आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं.” शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट सुप्रिया सुळे यांच्याही पसंतीस पडला आहे. आता ‘पठाण’च्या कमाईमध्ये आणखीन किती वाढ होणार? हे पाहणं रंजक ठरेल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor