गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:02 IST)

मला विमानातून उतरवले होते आता नियतीने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचले

bhagat sing koshyari
शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवले होते आता नियतीने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचले, असा पलटवार भगतसिंह कोश्यारी यांनी केला.
 
भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा धागा पकडून भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor