मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (08:15 IST)

भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत

devendra fadnavis
उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालां विरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले.
 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Edited By- Ratnadeep Ranshoor