बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (17:06 IST)

पूजाची आठवण मरू देणार नाही, तिचा पुतळा उभारू - लहू चव्हाण

"पूजा चव्हाण आज नसली तरी, तिची आठवण आम्ही मरू देणार नाही. दिवस मागे पडत आहेत. ती गेली तरी तिची आठवण आमच्या मनात असेल. त्यामुळे आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत," असं पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
"पूजाची आठवण राहायला पाहिजे, अशीच आमच्या सर्व कुटुंबीयांची इच्छा आहे. याबाबत आम्ही ठरवलं आहे. काहीही प्रयत्न करून आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत. परिस्थिती वाईट असल्यामुळे काही अडचणी येत आहेत. पण बँकेने लोन मंजूर केले आहे. आमच्या सर्व कुटुंबाने ठरवलं आहे. आम्हाला तिची आठवण मरु द्यायची नाही. ती जरी गेली असली तरी ती आमच्या मनात असणार आहे, आम्ही पूजाचा पुतळा उभारणार आहोत," असंही लहू चव्हाण म्हणाले.