वर्ध्यात जमावबंदीचे आदेश, वाशिम जिल्ह्यात संचारबंदी लागू

Last Modified गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (14:40 IST)
राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे गेलाय. जानेवारीत कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कपात झाली होती. रेट 5 टक्क्यांवर आला होता. त्यामुळे राज्यात अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.

मात्र आता पुन्हा रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रूग्णवाढीचा दर 5 टक्के होता. मात्र गेल्या आठवड्यात तो अचानक दुप्पट झालाय. फेब्रुवारीच्या १५ आणि १६ तारखेला राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ९ टक्क्यांवर गेलाय. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर झपाट्याने वाढतोय.
अमरावतीत ५६ टक्के, भंडाऱ्यात २६ टक्के, अकोल्यात २२ टक्के तर बुलडाण्यात २६.५ टक्के दर नोंदवण्यात आलाय. कोकणात सिंधुदुर्गातही रूग्णवाढीचा दर ४४ टक्क्यांवर पोहोचलाय.

कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वर्धा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेयत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येण्याचे आदेश दिले गेलेयत. औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ आजपासून संध्याकाळी ७ पर्यंत राहणार सुरू राहणार आहेत. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींचं बंधन असणार आहे.

वाशिम जिल्ह्यात आजपासून जमावबंदी लागू करण्यात आलीय. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आलेत. सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलाय. लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलीय. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलाय.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ बेड व आरोग्य सुविधा उपल्बध करण्यासाठी मदत व्हावी या ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करावे : चंद्रकांत पाटील
सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध
पुणे जिल्हा प्रशासनाने शहरातील कोविड रुग्णालयासाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध ...

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ...