शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:28 IST)

सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?-एकनाथ शिंदे

shinde
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. यावेळी नगराध्यक्ष निवडीच्य़ा विधेयकावरुन घमासान झाले. तर मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का होऊ नये असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.
 
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडचे विधेयक मंजूर झाल्यानंतर संसदभवनात विरोधकांनी शिंदेंना घेरलं. तर मुख्यमंत्री निवडही जनतेतून का होऊ नये असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याला उत्तर देताना ते म्हणाले, सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? जनतेच्या इच्छेनुसारच आम्ही कामं करतोय. सरकार अल्पमतात असताना जीआर काढले. कुणी कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला असेही शिंदेंनी अजित पवार यांना विचारले देवेंद्रजी और में हूॅं साथ साथ…मेरा मान है एकनाथ असा काव्यमय टोमना मारला.