शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (09:44 IST)

परबांना ईडीचा बुलावा आला असेल तर जावंच लागणार”- किरीट सोमय्या

kirit-somaiya
राज्यात जसे महाविकास आघाडीचे  सरकार आले आहे तेव्हापासून आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणानेच  ससेमिरा चालूच आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागील शनी काही हटताना दिसत नाही. भाजप  नेते किरीट सोमय्या  हे महाविकास अघाईच्या नेत्यांमागे कंबरच कसून लागलेले दिसत आहेत.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु आहे. अशातच शिवसेना  नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब  यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले, ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तसं समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी परबांना जावंच लागणार आहे.