केंद्राने गरीबांना लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल : टोपे
राज्यात गरिबांना मोफत लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. मात्र, गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राने गरीबांना लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या आठ रूग्णांच्या संपर्कात कोणकोण आले होते. त्याची माहिती घेतली जात आहे. मात्र अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळले नाहीत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लसीकरणासंदर्भात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.