मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (11:35 IST)

’हे’ नियम पाळल्यास विवाहसोहळा विना अडथळा पार पडेल

कोरोनाची पहिली लाट ओसरल्याने राज्यभरात मोठ्या थाटात विवाह सोहळे पार पडले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्यास मदत झाली.
 
त्यामुळे आता नवीन नियमांनुसार विवाह समारंभ केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी असेल.यासोबतच काही नियम व अटी शासनाने घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन केल्यास विवाहसोहळ्यात अडचण येणार नाही.
 
मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे आवश्यक असेल, अथवा त्यांनी वैध असणारे आरटीपीसीआर/आएटी/एनएटी/सीबीएनएएटी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.
 
यापैकी पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा वैध असणारे आरटीपीसीआर/आरएटी/एनएटी/सीबीएनएएटी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगले नसल्यास या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस १००० रुपये दंड व आस्थापनेकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.
 
एखाद्या ठिकाणी गुन्ह्याची पुनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरेपर्यंत ही जागा टाळेबंद करण्यात येईल व तेथे कोणत्याही पद्धतीचे संमेलन / एकत्रीकरण आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.एखादा विवाह समारंभ धार्मिक प्रार्थनास्थळी आयोजित केल्यास उपरोक्त नियमांच्या अधीन राहून त्यासाठी परवानगी देण्यात येईल.
----------------------