मंगळवार, 28 मार्च 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:22 IST)

अस्तानंतर आता लग्नसराईवर लॉकडाऊनचे संकट; २२ एप्रिलपासून मुहूर्त

गेल्या तीन महिन्यांच्या अस्त कालावधीनंतर येत्या २२ एप्रिलपासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ होत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यातील अस्त आणि आता पुन्हा कोरोना लॉकडाऊनची छाया लग्नसराईवर आहे. त्यामुळे वधू-वरांच्या पालकांसह सारेच मोठ्या चिंतेत अडकले आहेत.
 
गुरू शुक्राच्या अस्त काळामध्ये साखरपुडा, सुपारी फोडणे, लग्न निश्चित करण्याआधीचे विधी करता येऊ शकत होते. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्याववरही पाणी पडले. यंदाचे विवाह मुहुर्तांची माहिती देत आहेत, पंडित पंत.
 
विवाह मुहुर्ताच्या तारखा व महिने पुढीलप्रमाणे
या तिन्ही महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्त नाहीत.
२२ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २६ एप्रिल, २७ एप्रिल, २८ एप्रिल, २९ एप्रिल, ३० एप्रिल असे आठ मुहूर्त आहेत.
१ मे, २ मे, ७ मे, ८ मे, ९ मे, १३ मे, १४ मे, १५ मे असे आठ मुहूर्त आहेत.
 
३ जून, ४ जून, ५ जून, १६ जून, १९ जून, २० जून, २२ जून, २३ जून आणि २४ जून असे नऊ मुहूर्त आहेत.
१ जुलाई, २ जुलै, ७ जुलै, १३ जुलै, १५ जुलै असे पाच मुहूर्त आहेत.
या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
१५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर असे सात विवाह मुहूर्त आहेत.
१ डिसेंबर, २ डिसेंबर, ६ डिसेंबर, ७ डिसेंबर, ११ डिसेंबर, १३ डिसेंबर असे सहा मुहूर्त आहेत.
अशा पद्धतीने डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ एकूण ४८ विवाहमुहूर्त आहेत.
गुरु म्हणजे विवाह कार्यामधील प्रमुख ग्रह आहे. विवाह कार्यातील प्रत्येक विधीला गुरूचा आशीर्वाद असणे गरजेचे असते. गुरु हा पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच लग्नापूर्वी पिवळ्या रंगाची हळद लावली जाते. वधू तसेच वरांकडे परस्परांची ज्येष्ठ मंडळी हळद घेऊन येतात व ती वधू-वरांना लावतात. त्याचपद्धतीने विवाहातील अक्षतांना देखील हळद व कुंकू लावले जाते. विवाहातील प्रत्येक विधीमध्ये गुरुचे प्रतिनिधीत्व करणारी हळद प्रामुख्याने वापरली जाते. विवाहाप्रसंगी गुरूचा आशिर्वाद लाभणे तसेच वधुवरांच्या कुंडलीतील गुरुबळ लाभणे हे प्रकारे दीर्घकाळ वैवाहिक आयुष्याचे द्योतक मानले जाते. त्याचप्रमाणे शुक्र हा ग्रह वैवाहिक सुखाचा कारक असल्याने विवाह प्रसंगी शुक्राचा आशीर्वाद लाभणे हे दीर्घकालिन वैवाहिक सुखाचे प्रतिक मानले जाते. म्हणून विवाह प्रसंगी गुरु व शुक्र या ग्रहांचा आशिर्वाद लाभणे महत्त्वाचे असते, असे पंडित  पंत यांनी सांगितले आहे.