बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (15:37 IST)

आयसरच्या प्रवेशासाठी आयसर ॲप्टिट्यूट टेस्ट’ 9 जून रोजी होणार

देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयसरची ॲप्टिट्यूट टेस्ट’ 9 जून रोजी होणार असून या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. या साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 13 मे आहे.आयसर 1 जून रोजी हॉल तिकीट प्रसिध्द करणार.

देशात एकूण 7 ठिकाणी आयसर कार्यरत आहे. ते ठिकाण आहे मोहाली, बेहरामपूर, पुणे, कोलकाता, भोपाळ, तिरुपती, तिरुअनंतपुरम. आयसर मध्ये चार वर्षाचा विज्ञान पदवी (बीए) अभ्यासक्रम आणि पाच वर्षाचा एकात्मिक पद्व्यूत्तर पदवी(बीएस- एमएस) दुहेरी अभ्यासक्रम राबवला जातो. 
आयसरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी उत्तीर्ण असून बारावीला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या पैकी कोणतेही तीन विषय घेणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी किमान गुण 55 टक्के असावे. 

या साठी लागणारी अर्ज फी सामान्य, ईड्ब्ल्यूएस , ओबीसी, आणि ओबीसी -एनसीएल श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी 2 हजार रुपये आहे. तर दिव्यांगांसाठी, काश्मिरी स्थलांतरित, आणि एससी एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी 1 हजार रुपये आहे. आयसरसाठीची प्रवेश परीक्षा संगणक आधारित आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी  http://www.iiseradmission.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
 
 Edited by - Priya Dixit