शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2026 (19:25 IST)

हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला

Rains
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. हवामान विभागाने पुणे आणि नाशिकसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, मेघगर्जना, गारपीट आणि ताशी ६० किमी वेगापर्यंतच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे.
 
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, जो पुढील २४ ते ४८ तास लागू राहील.
 
हवामान विभागानुसार, ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्येही अशीच परिस्थिती असणार आहे.
 
तसेच केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  
मुंबईत आकाश ढगाळ राहील आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांना कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  
Edited By- Dhanashri Naik