शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:55 IST)

शाळा-कॉलेजमध्ये लसीकरण कॅम्प

vaccination
केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. मुंबईत ३ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून मुंबईत ९ लाख २२ हजार ५१६ मुले आहेत. या मुलांकडे आधार कार्ड नसले तरी त्यांनी कॉलेज, शाळेचे ओळखपत्र दाखवल्यास त्यांना लस देण्यात येईल. वॉक इन लसीकरणावर भर दिला जाणार असला तरी कोविन अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच या मुलांच्या लसीकरणात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक वॉर्डातील कॉलेजजवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. 3 जानेवारी रोजी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर 12 जानेवारीपर्यंत 1 लाख 8380 मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. 
 
१६ जानेवारीपासून मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीचा साठा नसल्याने अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले. आता लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस द्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबई महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ५० हजार डोस उपलब्ध आहेत. ९ लाख मुलांपैकी दिवसाला ३० हजार मुले आली तरी आठवडाभर पुरेल इतका लसीचा साठा आहे. त्यादरम्यान पुन्हा लसीचा साठा येऊन एका महिन्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते, असे काकाणी यांनी संगितले.
 
झोपडपट्टी परिसरात लसीकरण मोहीम
झोपडपट्टीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांनी सुरुवातीला लसीकरण केंद्रावर नोंदणी करत लस घ्यावी. त्यानंतर लसीच्या मात्रा अधिक उपलब्ध झाल्यास झोपडपट्टी परिसरात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
१५ ते १८ वयाच्या कैद्यांना मिळणार लस
विविध गुन्ह्यात कारागृहात असलेल्या १५ ते १८ वयोगटातील कैद्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. कैद्यांकडे आधार कार्ड नसल्याने कारागृहाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे लसीकरण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.