काळजाचा ठोका चुकवणारी घटना, अलिबागेत दोन महिला पॅरासेलिंग करताना दोर तुटला
प्रतीकात्मक चित्र -रायगडच्या अलिबागेत सहलीला जाण्याच्या बेत काहींनी आखला आणि अलिबागेत पॅरासेलिंग करताना दोघी मैत्रिणींसह जे काही घडले त्याची कोणीच कल्पना केली नसणार. या दोघी महिला पॅरासेलिंग करताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि त्या दोघी 100 मीटर उंचीवरून समुद्रात पडल्या. त्यांना समुद्रात पडताना बघून सर्वांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने त्यांनी घातलेल्या लाईफ जॅकेट्स मुळे दोघी बोटी पर्यंत तरंगत पोहचल्या.
या दोघी महिला मुंबईतून आलेल्या असून त्या जखमी झाल्या आहे .या महिलांचे नाव सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर असे आहेत. हा धक्कादायक प्रकार 27 नोव्हेंबर रोजी अलिबागच्या वर्सोली बीचवर घडला. मुंबईतून या महिला पर्यटनासाठी अलिबाग आल्या. पॅरासेलिंग करताना त्यांच्या सोबत हा प्रकार घडला.
पॅरासेलिंग करताना त्यांची दोर तुटली आणि त्या दोघी उंचीवरून समुद्राच्या पाण्यात मध्यभागी पडल्या. त्याच क्षणी बोटीवर असलेले जीवरक्षकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेत त्यांना वाचवले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे पर्यटकांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण होत आहे.