सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:15 IST)

नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रामगढ येथे 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी 14 वर्षीय विधीसंघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा नवीन कामठी पोलिस ठाण्यात  दाखल झाला आहे.
 
याबाबत माहिती अशी, आरोपी आणि पीडित मुलीचे घर शेजारीच आहे. आरोपीने रविवारी आपल्या 7 वर्षाच्या बहिणीला सांगून 4 वर्षीय चिमुकलीला घरी बोलावून घेतले.त्यानंतर बहिणीला फिशपॉट पाहणी आणि दुरुस्ती करण्यासाठी पाठविले.आरोपीने अल्पवयीन मुलीला बेडरुममध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.त्यानंतर त्यानं स्वतः चिमुकलीला तिच्या घरी सोडले. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी मुलगी सोफ्यावरून खाली पडल्याने तिच्या गुप्तांगाला मार लागल्याचे सांगितले आणि घरी पळून गेला. मुलीच्या आईने तिच्या गुप्तांगाची पाहणी केली असता रक्त पडत असल्याचे दिसले.
 
दरम्यान, तात्काळ घरच्यांनी खासगी रुग्णालयात नेले. चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.यानंतर, मुलीच्या आईवडिलांनी त्वरीत नवीन कामठी पोलिस ठाण्यात धाव घेतली.आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.तर, विधिसंघर्षग्रस्त (नियमबाह्य) अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन त्याला नागपूर येथील बाल कोर्टात हजर केले. त्यानंतर आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.