सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (12:37 IST)

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडी चे समन्स

पुण्यातील भोसरी जमिनी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदोदरी खडसे या आरोपी आहे या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वारंट काढला आहे. आज खडसे न्यायालयात हजर राहू शकले नाही त्यांची प्रकृती अस्वस्थ असून ते रुग्णालयात उपचाराधीन आहे. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे  लागणार असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स पाठविल्यावर मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता,पण सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वारंट काढला आहे. मंदाकिनी यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. या मुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंदाकिनी खडसे या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी आहे.