शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (11:38 IST)

भांडणातून स्वतःच घर पेटवलं,जवळपासच्या 10 घरांनी पेट घेतला , आरोपीला अटक केली

पाटण तालुक्यात माजगाव गावातील पती आणि पत्नीमध्ये झालेल्या वादाने घर पेटलं.वाद हे कधीच चांगले नसतात. वादामुळे घरे खाक होतात असे ऐकले होते पण आता हे प्रत्यक्षात घडून आले आहे . सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्या मध्ये घरगुती कारणावरून वाद सुरु झाले आणि पाहता पाहता हे वाद विकोपाला गेले आणि रागात येऊन संजय ने स्वतःचे घर पेटवले. आग लागल्यामुळे घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडर ने पेट घेतला.आणि आगीने रौद्र रूप घेऊन भडका घेतला. घराने भडका घेतल्यावर आजू बाजूची इतर घरे देखील पेटू लागली आणि बघता बघता इतर घरे देखील जळून खाक झाली. या घटनेमध्ये 10 घरे जळाली आहे. या अग्निकांडात 50 लाख रुपयां पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.या अग्निकांडात आपले घर गमावलेल्या लोकांनी संजयला बडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्रकरणाची नोंदणी केली आहे.आणि आरोपी संजय यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.