शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (23:32 IST)

दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना

जालना जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोघा तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कंडारी खुर्द गावात घडली आहे. त्या दोघा नराधमांनी पीडित मुलीला एका शेतात फरफटत नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार  केला. या घटनेची माहिती कुठं दिल्यास व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देखील त्या आरोपींनी दिली. याबाबत घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघा नराधमांना पोलिसांनी अटक  केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एकटी लक्ष्मणनगर तांडा गावाकडे चालत चालली होती. तेव्हा आरोपी सोपान आणि शंभू यांची नजर तिच्यावर पडली.यानंतर आरोपींनी पीडित मुलीचा रस्ता आडवला आणि तिला फरफटत शेजारच्या शेतात नेलं.याठिकाणी आरोपींनी पीडितेचं तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडीओही शूट केला.तसेच घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देखील त्या आरोपींनी दिली दरम्यान, पण पीडित मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत निदर्शनास आल्यानंतर गावातील नागरिकांनी संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर गावातील काही लोकांनी याबाबत माहिती बदनापूर पोलिसांना दिली.घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी दोघा आरोपीना अटक  करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून त्यांचा मोबाईल देखील जप्त केला आहे.