सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (16:50 IST)

11वी चे प्रवेश सुरु होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर करत म्हटले की अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. दरम्यान, मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. त्याबाबतही वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.  
 
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11वीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत चालत आलेल्या पद्धतीनुसारच 11वी चे प्रवेश होणार आहेत.
 
14 ऑगस्टपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
 
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.