गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (23:03 IST)

प्रेमात यशस्वी होण्याचे काही सोपे तोडगे

Here are some simple steps
तरुण वयात अनेक मुला मुलींमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं. प्रेम ही भावना अत्यंत नैसर्गिक आहे. पण प्रेमाच्या मार्गावर बरेच अडथळे असतात. बऱ्याच वेळा समाजाच्या दबावामुळे, आई- वडिलांच्या भीतीमुळे खऱं प्रेम यशस्वी होऊ शकत नाही.
 
प्रेमात यशस्वी होण्याचे काही सोपे तोडगे आहेत. यांचा वापर केल्यास प्रेमाच्या मार्गातील अडचणी दूर होऊन खऱ्या प्रेमाचा विजय होऊ शकतो. या तोडग्यांमुळे केवळ प्रेमातील अडचणीच दूर होणार नाहीत, तर दोघांमधील प्रेमही अधिकाधिक वाढेल. प्रेमाला असणारा सर्व प्रकारचा विरोध मावळेल.
 
प्रेमातील अडथळे दूर होण्यासाठी दोन सोपे उपाय करा. अमावस्येला तसंच शनिवारी एकमेकांना भेटणं टाळा. हा समय प्रेमास विशेष अनुकूल नसल्याने या दिवसांमध्ये प्रेम व्यक्त केल्यास यश मिळत नाही. शनिवार हा हनुमानाचा वार असल्यामुळे हा वार ब्रह्मचाऱ्यांचा असतो.
 
या उलट शुक्र हा प्रेमाचा आणि सौंदर्याचा अधिपती असलेला ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी अणि पौर्णिमेच्या दिवशी प्रेमाला अनुकूल समय असल्याने या दिवशी भेटीगाठी आणि प्रेमाच्या आणाभाका केल्यास प्रेम वाढते आणि प्रेमाचा विजय होतो. या दिवसांमध्ये प्रेम करणार्यांरमध्ये एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढते.