भारत V/S श्रीलंका दूसरा टी-20 श्रीलंकेचा दुसरा विकेट 39 धावांवर पडला, वरुण चक्रवर्तीने समरविक्रमाला पॅव्हेलियनवर पाठवले
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी -२० सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 132 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने 2 गडी गमावून 30+ धावा केल्या आहेत. सध्या दासुन शनाका आणि मिनोद भानुका क्रीजवर आहेत.
अविष्का फर्नांडो 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने राहुल चहारच्या हाती झेलबाद केले. राहुलने बाऊंड्री लाइनवर बेस्ट कॅच घेतला.
टीम इंडिया अखेरच्या 5 षटकांत केवळ 38 धावा करू शकली
भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 40 धावा केल्या. त्याशिवाय कोणताही फलंदाज 30+ धावा करू शकला नाही. टीम इंडिया अखेरच्या 5 षटकांत केवळ 38 धावा करू शकली आणि 3 गडी गमावले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयने 2 बळी घेतले. याशिवाय दुषमंथा चामिरा, वनिंदू हसरंगा आणि दासुन शनाका यांना 1-1 विकेट मिळाली.