औरंगाबादमध्ये नवाब मलिकांचा पुतळा जाळला  
					
										
                                       
                  
                  				  औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज क्रांती चौकात दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
				  													
						
																							
									  
	 
	औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांति चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
				  				  
	 
	नवाब मलिकांवर देशद्रोहाचा खटला दाखल कराः प्रविण दरेकर
	भाजप नेते आमि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करावेत, असा सल्ला दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.